By  
on  

'टर्री' सिनेमाचे निर्माते विक्रम धाकतोडे यांना अटक , पत्नीने केले गंभीर आरोप

आगामी ‘टर्री’ सिनेमाचे निर्माते विक्रम धाकतोडे यांना अहमदनगर येथे ‘टर्री’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अटक करण्यात आली. याआधी विक्रम धाकतोडे यांच्यावर प्रसिद्ध निर्माते व अभिनेता अमोल कागणे यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक कारवाई केली आहे. अमोल कागणे यांना खोटं आमिष दाखवून त्यांची ३० लाखांची फसवणूक धाकतोडे यांनी केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. आता पुन्हा एकदा विक्रम धाकतोडे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्याची पत्नी रुपाली धाकतोडे हिने अमानुष छळ आणि फसवणुकीवरून पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

या प्रकारणाबद्दल बोलताना रुपाली यांनी असे सांगितले की, विक्रमने प्रियांका यादव ही बहिण असल्याचे खोटे सांगत माझी फसवणूक केली, त्यांचे बहीण भावाचे नाते नसून शारिरीक संबंध असल्याचे मला कळताच कोणाला सांगू नको अशी सातत्याने धमकी मला देण्यात येत होती. जर ही बातमी कोणाला सांगितली तर प्रियांकाच्या राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात बऱ्याच ओळखी आहेत, आम्ही तुला गायब करू अशी धमकी मला दिली. माझ्यासोबत हा प्रकार घडला तसा विक्रमच्या आधीच्या पत्नीसोबतही घडल्याचे माझ्या कानी आले आहे. फिर्यादी रुपालीने आजवर विक्रमने केलेल्या अमानुष छळाच्या विरोधात ही तक्रार केली असून चित्रपट व्यवसायात गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळण्याचे आमिष दाखवून आरोपी विक्रमने पत्नी रुपालीकडून पैसे उकळले. इतकेच नव्हे तर गुंतवणूक केलेल्या कंपनीचे सर्व अधिकार मिळणार असे आमिष दाखवून विक्रम कन्सल्टन्सी आणि प्रियामो एंटरटेनमेंटचे आर्थिक व्यवहार पत्नीच्या अकाउंटवरून करून ओळखपत्रही पत्नीचे दाखविले. मारहाण आणि शिवीगाळ करून पत्नीचा अमानुष छळ आरोपी विक्रम सातत्याने करत होता. या त्रासाला कंटाळून पत्नी रुपालीने पनवेल पोलिस ठाण्यात पती विक्रम धाकतोडे विरुद्ध तक्रार नोंदविली आहे.

आरोपी विक्रम धाकतोडे हा चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतो,  ते चित्रपट खरेदी विक्रीचा व्यवसायही करतात. चित्रपटसृष्टीत आणि राजकीय क्षेत्रात आपले वजन असल्याचे सांगत आरोपी विक्रमने फिर्यादी रुपालीला नेहमी धाकात ठेवले. या सर्वांचा पर्दाफाश करत रुपालीने तक्रार नोंदवून योग्य पाऊल उचलले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive