दिग्गज अभिनेते दलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी केली अटक

By  
on  

अभिनेता दलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी 35 ग्रॅम एमडी बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ड्रग पेडलरच्या चौकशीनंतर ध्रुव याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने ड्रग पेडलर मुजामिल अब्दुल रहमान शेख  याला मेफेड्रोन या ड्रगसोबत अटक केली आहे. त्याला 20 एप्रिलला अटक केली आहे. त्यावेळी त्याचं मोबाईल चॅट तपासलं असता. ध्रुवसोबतचं संभाषण समोर आलं आहे. 

या चॅटमध्ये ध्रुवने अनेकदा ड्रग्जची ऑर्डर दिली आहे. यावेळी त्याने या पेडलरच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले होते. ध्रुव 2019 पासून मार्च 2021 पर्यंत पेडलरच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

Recommended

Loading...
Share