By  
on  

अमृताने साजरा केला ‘स्पेशल ख्रिसमस’, केली आनंदाची देवाण घेवाण

सगळ्या सगळं वातावरण कसं ख्रिसमसमय झालं आहे. लाल टोपी घातलेला सांता प्रत्येकाच्याच आयुष्यात आनंदाची उधळण करू दे अशी प्रत्येकाची प्रार्थना आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही ख्रिसमसची जोरदार तयारी केली आहे. पण हा सण मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत साजरा ना करता विशेष मुलांसोबत साजरा केला.

 

ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या गतीमंद मुलांसोबत तिने ‘ख्रिसमस इव्ह’ साजरी केली. यानिमित्तने तिने सामाजिक बंधिलकीचा नवा दाखला दिला आहे.

यावेळी अमृता या मुलांसोबत खेळली. सांता बनून तिने भेटवस्तूही दिल्या. गप्पा मारल्या. यावेळी अमृताच्या आणि तेथील मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून जात होता.  अमृतादेखील या मुलांच्या निर्भेळ प्रेमाने भारावून गेली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive