सोसायटीमध्ये चेअरमनला धमकी दिल्याप्रकरणी पायल रोहतगीला अटक

By  
on  

अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सोसायटीच्या चेअरमनना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.  सोसायटीची सदस्य नसूनही तिने मिटींगमध्ये तमाशा केला. यासोबतच चेअरमनसह अनेकांना शिवीगाळ केली असाही तिच्यावर आरोप आहे. 

 

 

मुलांनी सोसायटीमध्ये खेळण्यावर तिने आक्षेप घेतला आहे. यापुर्वीही तिने अनेकदा आक्षेपार्ह विधानं केली आहेत. या प्रकरणाबाबत पायलनेही पोस्ट करत चेअरमनवर गुंडगिरीचे आरोप केले आहेत. नेहमीच  आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या पायलला यापूर्वीही नेहरू गांधी परिवारावर भाष्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये तिला नंतर जामीन मंजूर झाला होता.

Recommended

Loading...
Share