बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक

By  
on  

 ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला  पोलिसांनी अटक केली आहे. हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर ( टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी हीनासह 22 जणांना ताब्यात घेतलं आहे. नाशिक जवळील इगतपुरी येथे ही रेव्ह पार्टी सुरु होती. 

शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. या पार्टीची चाहूल पोलिसांना लागली. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी हे तरुण कलाकार बेधुंद असताना छापा टाकला. 

 

 

 

 

 

 

 

 

(Source -TV 9 Marathi )

Recommended

Loading...
Share