२०१८मध्ये अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यंदाच्या वर्षीही हा सिलसिला कायम राहील असं वाटत आहे. कारण अलीकडेच आणखी एक स्टार किड बॉलिवूडचा हिस्सा होणार असल्याचं समोर आहे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा यावर्षी बॉलिवुड्मध्ये पदार्पण करणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार प्रियांक अक्षय खन्नाच्या आगामी ‘सब कुशल मंगल है’ या सिनेमात दिसेल. या सिनेमाचं दिग्दर्शनही नव्या हातात असणार आहे. करण कश्यप हे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतील.
मुलाच्या डेब्युबाबत पदमिनी म्हणते, या क्षेत्रात येणं हा प्रियांकचा स्वत:चा निर्णय आहे. मुळात घरात नॉन फिल्मी वातावरण असल्याने त्याला कुणीही फोर्स केला नाही. प्रियांकने न्युयॉर्क येथून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. सब कुशल मंगल है या सिनेमाच्या शुटिंगला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होत आहे.
https://www.instagram.com/p/Bm73aXQFXIS/?utm_source=ig_web_copy_link