By  
on  

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी लूकमध्ये केला मोठा बदल, आता असे दिसतात सुरेश वाडकर

बदल हा संसाराचा नियम आहे. हा नियम प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी फारच मनावर घेतला आहे. अलीकडेच एका मैफिलीत सुरेश वाडकर यांचा नवा लूक पहायला मिळाला आहे. त्यांच्या लूकची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

https://twitter.com/SwityShinde/status/1096853806011293697

वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी केशरोपण करून नवीन लूक मिळवला आहे. अलीकडेच आनंदयात्री कार्यक्रमात त्यांचा हा नवा लूक पाहायला मिळाला आहे. करीअर घडवण्याच्या धावपळीत सुरेशजींना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नव्हता. पण आता मात्र सुरेशजींनी स्वत:कडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या नव्या लूकमुळे ते अधिक तरुण झाल्यासारखे दिसत आहेत. चाहत्यांनीही त्यांच्या या लूकला पसंती दिली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive