अभिनेत्री नेहा गद्रे अडकली लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

By  
on  

सध्या लग्नसराई सुरु आहे. अशा वेळी सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकत आहेत. अलीकडेच अभिनेत्री नेहा गद्रे हिचा विवाहसोहळा पार पड्ला. सोशल मिडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BudG2IBhRDw/?utm_source=ig_web_copy_link

नेहाने इशान बापट्सोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत. २०१८मध्ये नेहा आणि इशान यांचा साखरपुडा पार पडला होता. नेहाला ‘मन उधाण वा-याचे’ या मालिकेत साकारलेल्या गौरीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धी मिळाली होती.

काही दिवसांपूर्वीच तिचा विवाहसोहळा पुण्यात पार पडला. नेहा एमबीबीएस डॉक्टर आहे. पण अभिनयाची आवड असल्याने तिने या क्षेत्राकडे मोर्चा वळवला. नेहाने ‘मोकळा श्वास’ आणि गडबड झाली या सिनेमात देखील काम केलं आहे.

Recommended

Share