माधुरी दीक्षित आळवणार पॉप संगीताचे सूर, पहिला पॉप अल्बम होणार प्रसिद्ध

By  
on  

करीअरच्या सेकंड इनिंगमध्येही यशाचा अनुभव घेणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीत सध्या आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे. माधुरीचं अलीकडेच ‘कलंक’ सिनेमातील गाणं रिलीज झालं. यात तिच्या लूकची आणि नृत्याचीही बरीच चर्चा झाली.

माधुरी आता अनोख्या माध्यमातून रसिकांसमोर येत आहे. माधुरी आता पॉपसिंगर बनणार आहे. तिच्या पहिल्या पॉप अल्बमचं रेकॉर्डिंग पुर्ण झालं असून हा अल्बम पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. माधुरीने मराठीतही कामाचा धडाका सुरु ठेवला आहे. ‘बकेट लिस्ट’नंतर माधुरी निर्मित ’१५ ऑगस्ट’ हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. माधुरीच्या चाहत्यांना मात्र तिच्या या पॉप अल्बमची उत्सुकता असणार यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share