मुंबई पोलिस शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला घेऊन कोर्टासाठी रवाना, चौकशीत सहकार्य करत नसल्याचा गुन्हे शाखेचा आरोप

By  
on  

पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तीन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. काही वेळापूर्वीच राजला पोलिसांनी भायखळा जेलमधून कोर्टासाठी रवाना केलं आहे. तेव्हा माध्यमांनी त्याचं छायाचित्र टिपलं.

मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे आणखी सात दिवसांच्या रिमांडची मागणी केल्याचं कळतंय. तसंच राज हा गुन्हे शाखेला चौकशी दरम्यान अजिबात सहकार्य करत नसल्याचंसुध्दा सुत्रांकडून स्पष्ट झालं आहे. 

 

सध्या तरी शिल्पाचा या प्रकरणामध्ये काही सहभाग असल्याचं दिसत नाहीय असं पोलिसांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं.

Recommended

Loading...
Share