‘ शारीरिक संबंध ठेवण्याची केली मागणी…’, ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या प्रोडक्शन कंट्रोलरविरोधात अभिनेत्रीची तक्रार

By  
on  

छोट्या पडद्यावरची  ‘सहकुटुंब सहपरिवार’ सध्या भलतीच चर्चेत आहे. पण या मालिकेतील कथानकाच्या ट्विस्टमुळे नाही तर वादांमुळे. ही मालिका वादाच्या भोव-यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्याची आई म्हणजेच अभिनेता सुनिल बर्वेच्या आईंची भूमिका साकारणा-या अन्नपूर्णा विठ्ठल   यांनी मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री स्वाती भदवेने प्रोडक्शन कंट्रोलर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एका ईंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्वातीने सांगितलं की  ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत तिने अभिनेत्री नंदिता पाटकरची बॉडी डबल  म्हणून काम केलं आहे. 

‘प्रोडक्शन कंट्रोलरने माझ्याकडे फोन नंबर मागितला होता. मी पुण्यातून काम करु शकते की नाही असे त्याने मला विचारले. मी हो म्हणत कुठूनही काम करु शकते असे सांगितले. त्यानंतर त्याने मला तुझ्याकडून काही तरी हवे आहे असे सांगितले. मी त्याला कमिशन देईन असे सांगितले. पण त्याने नकार देत म्हटले की मला आणखी काही तरी हवे आहे’ असे स्वाती म्हणाली. 

स्वाती पुढे सांगते, त्याला माझ्याकडून शारिरीक संबध ठेवायचे होते. मला ते अजिबातच मान्य नव्हते तर धक्कादायक होते. या मुलाखतीमध्ये स्वातीने या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे सांगितले आहे.

Recommended

Loading...
Share