अभिनेत्री रसिका सुनील म्हणजेच ‘माझ्या नव-याची बायको’मधील शनाया सध्या अमेरिकेत असल्याचं तुम्हाला माहित आहेच. रसिका तिथे अॅडव्हेंचर स्पोर्ट्सदेखील एंजॉय करत असल्याचं दिसत आहे. अलीकडेच तिने विमान चालवण्याचा अनुभवही घेतला. यासंबंधीचे फोटोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यावेळी कमेंट्स मध्ये अनेका चाहत्यांनी तिला भारतात कधी येणार हे देखील विचारलं आहे. यावेळी तिने स्कुबासंबंधित काही शंका देखील विचारू शकता असं म्हटलं आहे.
पण आता रसिका आकाशाच्या उंचीनंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज घेताना दिसत आहे. रसिकाने अलीकडेच स्कुबा डायव्हिंग केलं आहे. याचे फोटोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. शनायाच्या भूमिकेमुळे रसिकाला भरपुर प्रसिद्धी मिळाली. पण अभिनयात उच्च शिक्षण घ्यायचे असल्याने तिने मालिका सोडली आणि अमेरिकेला शिफ्ट झाली. रसिका तिथूनही चाहत्यांसाठी अॅक्टीव्हिटीचे फोटो शेअर करत असते. या फोटो आणि व्हिडियोंना चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो.