मराठी अस्मितेच्या नावाखाली अश्लील ट्रोलिंग करणा-यांना अभिनेत्री केतकी चितळेचा सणसणीत टोला

By  
on  

अभिनेत्री केतकी चितळे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती काही व्हिडियोही शेअर करत असते. नुकतेच तिने लहान मुलं आणि पालकत्व या विषयावर एक व्हिडियो शेअर केला होता. तिचे काही फॉलोअर्स हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलणारे आणि जाणणारे असल्याने तिने हा व्हिडियो हिंदीत बनवला होता.

 

पण या हिंदी भाषेत बोलल्यामुळे ट्रोलर्सनी तिला अश्लील शब्दात ट्रोल केलं. अनेकांनी तिला देश सोडून जाण्यास सांगितलं. अशा लोकांसाठी केतकीने एक व्हिडियो बनवला आहे. या व्हिडियोतून तिने शेलक्या भाषेत या ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.

 

 केतकीने या ट्रोलर्सचं वेड्या वाकड्या भाषेतील व्याकरणही सुधारलं. अनेकांनी तिच्याबद्दल आणि तिच्या आईबद्दल असभ्य शब्दात ट्रोलिंग केलं होतं. केतकीने या ट्रोलर्सना विचारलं की, तिच्यावर रेप केल्यानेच किंवा तिला अश्लील शब्दात ट्रोल केल्यानेच मराठी अस्मिता सिद्ध होते का? मराठी भाषा इतकी कमकुवत आहे का? की तिच्याविषयी जाहीर प्रेम सादर केलं नाही तर ती कमी पडेल. केतकीच्या अशा खरमरीत व्हिडियोने तरी ट्रोलर्स शांत राहतील अशी आशा करु.

 

Recommended

Loading...
Share