नेटिझन्स कधी कुणाला ट्रोल करतील हे सांगता येत नाही. पण ट्रोलिंगमुळे अनेकांना कारण नसताना मनस्ताप भोगावा लागू शकतो. अभिनेत्री रेणुका शहाणे यांना ट्रोलर्सच्या चुकिमुळे मनस्ताप भोगावा लागला. सध्या बिग बॉसच्या घरातील सदस्य असलेल्या किशोरी शहाणेंमुळे रेणुका यांच्यासोबत हा प्रकार घडला.
चक्क हॅशटॅग shameonrenukaandparag चालवता? किशोरी आणि रेणुका मध्ये काहीच अंतर दिसत नाही का तुम्हाला? बघा नं! तिचं नाव "कि" नी सुरू होतं तर माझ्या नावाचा शेवट "का" नी होतो! तिच्या नावाचा शेवट "री" नी होतो आणि माझ्या नावाची सुरूवात "रे" नी होते. बघा!जमलं तर फरक शोधा, खूप सापडतील https://t.co/F996XTc7wp
— Renuka Shahane (@renukash) June 15, 2019
नेटक-यांनी शहाणे आडनावातील साधर्म्यामुळे रेणुका शहाणेंनाच किशोरी शहाणे समजून ट्रोल केलं. याशिवाय त्यांना अनेकदा किशोरी शहाणे म्हणून टॅगही केलं जातं. याशिवाय नेटक-यांनी shameonrenukaandparag हा हॅशटॅगही ट्वीटरवर ट्रेंड केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे रेणुका शहाणे चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी ट्वीट करून नेटक-यांना चांगलंच झोडलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘मी किशोरी शहाणे नाही,बिग बाॅस मध्ये नाही, माझा ह्या कशाशीच काहीही संबंध नाही! कृपया मला टॅग करू नका. समाज माध्यमांचा गैरवापर टाळा.’ आता यावर नेटकरी सुधरतात का ते लवकरच कळेल.