By  
on  

अर्जुन कपूरच्या 'पानीपत'मध्ये या मराठी स्टारकिडची वर्णी

बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड येऊ घातला आहे. बाजीराव मस्तानीनंतर पेशवाईचं दर्शन घडवणारा आणखी एक सिनेमा येत आहे तो म्हणजे, ‘पानीपत’. अर्जुन कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय आणखी एका मराठी कलाकार या सिनेमात झळकत आहे तो म्हणजे गश्मीर महाजनी. गश्मीर या सिनेमात जनकोजी शिंदे ही व्यक्तिरेखा साकारणार हे स्पष्ट झालं आहे.

 

गश्मीरने नुकताच एक व्हिडियो शेअर केला होता. यात तो म्हणतो. ‘पानीपतच्या शुटिंगचं रॅप अप आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे. खरंच खुप सुंदर अनुभव आहे. आशु सरांचे आभार त्यांनी मला या सिनेमात काम करण्याची संधी दिली. सगळ्या टीमचे आभार’. जनकोजी साकारण्यासाठी गश्मीरला तलवारबाजी आणि घोडेस्वारीचं तंत्र आत्मसात करावं लागलं असेल यात शंका नाही.

अर्जुन आणि गश्मीरसोबत या सिनेमात क्रिती सॅनॉन, संजय दत्त आणि एका विशेष भूमिकेत झीनत अमानही दिसणार आहे. आशुतोष गोवारिकर ‘मोहेंजोदारो’नंतर ब-याच दिवसांनी ऐतिहासिक सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये रसिकांच्या भेटीला येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#itsnotaboutthemuscles it's about setting benchmarks and superseding urself.

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

Recommended

PeepingMoon Exclusive