अमेय वाघ सांगतोय ‘गर्लफ्रेंड’सोबतची ‘स्वीट वाली, क्युटवाली लव्हस्टोरी
अमेय वाघच्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमाने रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या सिनेमात सई ताम्हणकर त्याची गर्लफ्रेंड आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी वाढदिवस असलेल्या अमेयला गर्लफ्रेंड नसते. पण अचानक त्याला एकेदिवशी सई भेटते आणि त्याची लव्हस्टोरी मार्गाला लागते. याचदरम्यान आलं गर्लफ्रेंड सिनेमातील नवीन गाणं लव्हस्टोरी.
या गाण्याचा बाज काहीसा ८० च्या दशकातील संगीताची आठवण करून देणारा वाटतो. हलकं फुलकं आणि क्रिस्पी नेचरचं हे गाणं नचिकेत म्हणजेच अमेयची लव्हस्टोरी सांगतं. नचिकेत आणि अलिशाची ही लव्हस्टोरी मजेदार आहे. या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धनने लिहिले आहेत. तर हृषीकेश, सौरभ, जसराज यांनी यांनी संगीत साज चढवला आहे. ‘गर्लफ्रेंड’ या सिनेमाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. अमेय आणि सईशिवाय या सिनेमात इशा केसकर-उदय नेने, सुयोग गोऱ्हे- प्रत्यंचा नराळे या जोड्यादेखील आहेत. याशिवाय कविता मेढेकर, रसिका सुनील, सागर देशमुख, यतीन कार्येकर यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.