By  
on  

सोनाली-सिद्धूची पावसाचं स्वागत करण्याची अनोखी पद्धत तुम्ही पाहिली का?

 

सध्या सगळीकडे पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सगळीकडे पावसाने हात-पाय पसरले आहेत. ऋतूमधील या पहिल्या पावसाचं सेलिब्रिटीही हटके स्वागत करत आहेत. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांनीही पावसाचं खास अंदाजात स्वागत केलं आहे.

 

सिद्धार्थ त्याच्या ‘इरादा पक्का’ या सिनेमातील ‘भिजून गेला वारा हे’ गाणं गाताना दिसत आहे तर सोनाली त्याला साथ देताना दिसत आहे.

कालपासून खूप छान पाऊस पडतोय...

निसर्गाच्या या बेभान करणाऱ्या वातावरणात आमचं आवडतं गाणं खास तुमच्यासाठी...ऐकताय ना...?

 या कॅप्शनसहित सिद्धार्थने हा व्हिडियो शेअर केला आहे. ही जोडी कुठेतरी जाताना दिसत आहे, कारण फ्रंट सीटवर सिद्धार्थ बसला आहे तर मागी सीटवरून सोनाली मस्ती करताना दिसत आहे. ‘इरादा पक्का’ या सिनेमात ही जोडी एकत्र दिसली होती. सिद्धार्थ अलीकडेच बॉलिवूडच्या ‘सिंबा’ या सिनेमात झळकला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive