मराठी सिनेसृष्टीत हॅंड्सम अभिनेत्यांची कमी नाही. पण पडद्यावर डॅशिंग असणारे हे अभिनेते घरात मात्र हळवे बाबा असतात. मराठी सिनेसृष्टीतील हे बाबालोक त्यांच्या सुपर क्युटचे फोटो नेहमी शेअर करत असतात. अभिनेता गश्मीर महाजनीने देखील त्याच्या बेबी बॉयसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे ज्यु. गश्मीर बाबाइतकाच सोशल मिडियावर लोकप्रिय आहे. गश्मीरने गौरी देशमुखशी लग्न केलं आहे. गश्मीर सध्या ‘पानीपत’ या सिनेमात अर्जुन कपूरसोबत झळकणार आहे.
नुकतंच त्याने या सिनेमाचं शुटिंग संपवलं आहे. याशिवाय तो 'अजिंक्य योद्धा' - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्यातूनही रसिकांच्या भेटीला येत आहे.
गश्मीर या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका साकारत आहे. गश्मीरने त्याच्या चिमुकल्याचं नाव जाहीर केलं नसलं तरी ते नक्कीच युनिक असेल असं त्याच्या फॅन्सना वाटतं.