पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरने दिलंय चाहत्यांना हे हटके चॅलेंज

By  
on  

सध्या सगळीकडे सोशल मिडियावरील विविध चॅलेंजेसचा ट्रेंड जोरात सुरु आहे. नुकतंच बॉटल कॅप चॅलेंजवर सेलिब्रिटींनी आपला फिटनेसचा परिचय दिला. या सगळ्या धामधुमीत पाठकबाई कशा गप्प बसतील? त्यांनीही चाहत्यांना एक चॅलेंज दिलं आहे. ‘ तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये एक वेगळं वळण आलं आहे. यात आता राजाची एंट्री झाली आहे. यावरूनच पाठकबाईंनी हे चॅलेंज दिलं आहे.

 

या चॅलेंजचं नाव आहे ‘आरआर चॅलेंज’. एका अपघातात सापडलेला राणा आता मालिकेत परत आला असला तरी तो पूर्णपणे वेगळा आहे. राणा गायकवाड आता राजा राजगोंडा बनून आला आहे. राजा हा स्वॅग नेहमीपेक्षा हटके आहे. राजाच्या याच स्वॅगच चॅलेंज पाठकबाईंनी चाहत्यांना दिलं आहे. यामध्ये चाहत्यांना राजाची स्टाईल कॉपी करायची आहे. या स्टाईलचा व्हिडियो पोस्ट करून #Rajachaswag या हॅशटॅगसह पोस्ट करायचा आहे. आता पाहु कोण कोण या राजाचा स्वॅग आपलासा करतात.

Recommended

Loading...
Share