By  
on  

स्पृहा जोशी झळकणार ‘द ऑफिस’ या वेबसिरीजमध्ये

स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती कविताही उत्तम करते. नाटक, सिनेमा, मालिका, सुत्रसंचालन अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर स्पृहा आता वेबप्लॅटफॉर्मसाठी सज्ज झाली आहे. स्पृहा हिंदीमधील ‘द ऑफिस’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. ही वेबसिरीज 13 एपिसोडसची असणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Click from the Waman Hari Pethe photo series 'Wedding Collection' @bharatpawarphotography . #jewellery #lovers #WHP

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

विकिन्स चावलामध्ये ९ ते ५  यावेळेत काम करणा-या कर्मचा-यांवर ही कथा बेतली आहे. ऑफिस कर्मचा-यांमधील आंबटगोड नातं, त्यांच्यातील बंध, स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण या मालिकेत दिसून येईल. स्पृहाच्या या वेबसिरीजमध्ये गीता या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. गीता रिअल इस्टेट डीलिंगचं कम करत असते. स्पृहा या नव्या संधीबद्दल खुपच उत्साहित आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला. मोगरा कोमेजला होता इतके दिवस.. आज खळखळून हसला! कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती, सोनेरी संधीप्रकाशात भिजलेली वाटत होती. वळचणीची पांढरी कबुतरं एरवी नको करतात अगदी. आज त्यांच्या भिजल्या पंखाची थरथर पाहतच बसले मी,एकटक. झाडं मोहरली,वेली बावरल्या, थंड हवेची झुळूक, मातीचं महागडं अत्तर उधळून गेली खुळ्यासारखं जगभर ! थोडासा गारवा, हलकी शिरशिरी.. कात टाकली आसमंताने अलगद... आकाशात अचानक वेगळेच रंग आले. पाण्याला रंग नसतो खरंतर; पण पावसाला मात्र असतो काय गंमत आहे नाही?? हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग.. तो वेड लावतो, आणि आपणही वेडे होतो.. रिमझिमत्या सरी आठवणी होऊन वाहायला लागतात.. जरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविताच सुचायला लागतात..!!! - स्पृहा @ashayrtulalwar

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

या वेबसिरीजमध्ये मुकुल चढ्ढा, गौहर खान, अभिनव शर्मा, गाविन मेथलका,सयनदीप सेनगुप्ता, समृद्धी दिवाण, रणवीर शौरी, गोपाल दत्त, प्रियंका सेटिया, प्रीती कोचर, सुनील जेटली, चाइन हो लिआओ, मयुर बन्सीवाल आणि नेहपाल गौतम यांच्या भूमिका आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

असे काही देश असतात मन जिथे उडून उडून हट्ट करून जाऊ पाहतं, अशा तद्दन फसव्या देशी तुझ्यासारख्या माझ्यासारख्या वेड्याबागड्या माणसांनी कधी कधी जायचं नसतं.. . 'येऊ नका' लिहिलं असतं जिथल्या बंद दारांवर, स्कायस्क्रॅपर्सच्या जंगलात हरवलेलं शांतघर.. कोरड्या विहिरी, तळाशी कुट्ट काळोख सापडे, ज्याच्या त्याच्या डोळ्यांपुरते आकाशाचे तुकडे. हवा येते, पण स्वतःच वेडी पिंजऱ्यात घेते कोंडून दवसुद्धा कोवळं कोवळं वाफ होतं, जातं उडून चिंचा, कैऱ्या आठवत तिथे रेंगाळायचं नसतं, अशा तद्दन फसव्या देशी तुझ्यासारख्या माझ्यासारख्या वेड्याबागड्या माणसांनी कधी कधी जायचं नसतं.. - स्पृहा . @lets_draw_light

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive