पाहा Photos, अभिनयासोबत फोटोग्राफीत सुद्धा हा अभिनेता आहे माहीर

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासोबत इतर अनेक बाबतीत सुद्धा सरस आहेत. कोणाला अभिनयासोबत व्यायामाची आवड आहे, कोणाला चित्रकलेची तर कोणाला आणखी कशाची. 

अशाच हरहुन्नरी कलाकारांमध्ये सुयश टिळकचं सुद्धा नाव घेतलं जातं. सुयशला अभिनयासोबत फोटोग्राफीची सुद्धा प्रचंड आवड आहे. 

फोटोग्राफर ही सुयशची मराठी सिनेसृष्टीतील एक नवी ओळख आहे. सुयशचं इन्टाग्राम पाहताचा त्याच्या चाहत्यांना त्याच्या या नव्या ओळखीचा प्रत्यय येतो. 

सुयशला फिरण्याची आवड नसुन त्याला या भ्रमंतीमध्ये निसर्गातल्या विविध छटा आपल्या कॅमेरात कैद करायला आवडतात 

'का रे दुरावा' मालिकेतुन सुयश टिळक हे नाव अभिनेता म्हणुन घराघरात लोकप्रिय झालं. 

सुयशने 'क्लासमेट' या सिनेमात सुद्धा महत्वपुर्ण भुमिका केली. 

सुयशने 'बापमाणुस' सारख्या अनेक मालिकांमध्ये. अभिनय केला आहे. सध्या सुयश 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत झळकत आहे. 

सुयशने टिपलेले फोटो त्याच्यामधल्या उत्तम फोटोग्राफरची ओळख करुन देतात

Recommended

Loading...
Share