सध्या स्टार प्रवाहवरील जीवलगा ही मालिका रंजक होत चालली आहे. कथानकासोबतच या मालिकेतील कलाकारांनाही रसिकांच्या पसंतीची पावती मिळत आहे.
मालिकेत स्वप्नील, अमृता आणि सिद्धार्थ असे प्रथितयश कलाकार असतानाही मधुरा देशपांडे म्हणजेच विधीने रसिकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.
अत्यंत सालस, संयत अशी विधी यात मधुराने साकारली आहे. मधुरा मुळची पुण्याची आहे.
तिने भरतनाट्यम या नृत्यप्रकाराचं शिक्षणही घेतलं आहे. मधुराने सर्वप्रथम ‘झुंज’ या मालिकेतून करीअरला सुरुवात केली.
पण तिला ओळख दिली ‘असे हे कन्यादान’ मालिकेतील गायत्रीच्या भूमिकेने. या मालिकेत अत्यंत गुणी, सालस अशी व्यक्तिरेखा तिने साकारली होती
. या मालिकेनंतर ती ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत शशांक केतकरसोबत झळकली होती.
त्यानंतर तिने अमृता खानविलकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या ‘बस स्टॉप’ या सिनेमातही काम केलं. हा तिचा पहिला सिनेमा होता.
त्यानंतर ती सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत ‘गुलाबजाम’ या सिनेमातही दिसली होती.
आता जीवलगामधील तिच्या व्यक्तिरेखेलाही लोकप्रियताही मिळत आहे.