फोटोमध्ये पाऊट केलेल्या या सौंदर्यवतीला तुम्ही ओळखलंत का?

By  
on  

मराठी कलाकारांनी आजवर अनेकदा स्त्रीवेष करून भूमिका साकारल्या आहेत. अगदी बालगंधर्वापासून ते ‘अशीही बनवा बनवी’पर्यंतच्या भूमिकांना रसिकांनी पसंती दर्शवली आहे. आता आणखी एक कलाकार स्त्री व्यक्तीरेखेत रसिकांच्या समोर आला आहे. मराठी सिनेमाचा चॉकलेट बॉय स्वप्नील नुकताच स्त्रीवेषातील फोटो शेअर केला आहे. यामुळे सोशल मिडियावर अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

 

ओळखा पाहू असं कॅप्शन स्वप्नीलने या फोटोला दिलं आहे. स्वप्नीलचा हा लूक नव्या सिनेमा, मालिका कि नाटक यापैकी कशासाठी आहे हे समोर आलेलं नाही. पण काळ्या बॉर्डरची पांढरी साडी, कानात मोठे मोठे झुमके, टिकली, आय लायनर लावलेला स्वप्नील खुपच मादक दिसत आहे. यावर त्याने पाऊट करून या फोटोला चार चांद लावले आहेत. आता स्वप्नील या फोटोसंदर्भात कोणती घोषणा करतो याची चाहत्यांना उत्सुकता आहे. स्वप्नील सध्या जीवलगा मालिकेत विश्वासची भूमिका साकारत आहे.

Recommended

Loading...
Share