पाहा व्हिडिओ, अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणतोय,'अग्गबाई सासूबाई'

By  
on  

असं म्हणतात वय केवळ एक आकडा आहे. पण अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिची आई आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूबाईंनी मात्र हे सिद्ध करून दाखवलं आहे. अनिकेतच्या सासूबाईंचा धमाल डान्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. स्नेहा चव्हाणने हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

या व्हिडियोमध्ये अनिकेतच्या सासूबाई  राधिका चव्हाण धमाल आणि एनर्जीपूर्ण डान्स करताना दिसत आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये स्नेहा म्हणते,  ‘कोण म्हणेल की ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहापटीने अधिक ऊर्जा आणि उत्साह तिच्यात आहे.’ ‘स्त्री’ सिनेमातील गाण्यावर स्नेहाच्या आईनी पावलं थिरकवली आहेत. विशेष म्हणजे स्नेहा आणि अनिकेतचं लग्न जुळवण्यात अनिकेतची मावशी आणि स्नेहाच्या आईनेच पुढाकार घेतला होता. ही जोडी 10 डिसेंबर 2018 मध्ये लग्नबंधनात अडकली होती.

Recommended

Loading...
Share