By  
on  

संपन्न अभिनयाची ‘प्रभावळ’ असलेला अभिनेता: दिलीप प्रभावळकर

दिलीप प्रभावळकर यांचं नाव माहित नसलेला मराठी प्रेक्षक शोधून सापडणार नाही. निदान अनेकांना त्यांचं नाव माहित नसेल पण त्यांनी साकारलेल्या भूमिका मात्र नक्कीच लक्षात येईल. उत्तम प्रतिभेचा कलावंत आणि अत्यंत विनयी माणून दिलीप यांची ओळख आहे. कोणत्याही व्यक्तिरेखेत सहज मिसळून जाणारा कलाकार म्हणून प्रभावळकरांची ओळख आहे. 

एकाचवेळी 75 वर्षांचे गंगाधर टिपरे साकारू शकतात आणि त्याच्या निम्म्या वयाचे चिमणराव बनून कावेरीसोबत नाटकालाही जातात. तीस वर्षांहून अधिक काळ रंगदेवतेची सेवा केलेल्या प्रभावळकरांना या कारकिर्दीचा यत्किंचितही गर्व नाही हा त्यांच्यातील कलाकाराचा महत्त्वाचा गुण आहे.

त्यांनी झपाटलेला सिनेमात तात्याविंचू सारखा अट्टल गुन्हेगार साकारला तर ‘चौकट राजा’ या सिनेमात अत्यंत निरागस अशी भूमिका साकारली. श्रीयुत गंगधर टिपरे, टुरटुर, चिमणराव गुंड्याभाऊ, बोक्या सातबंडे या मालिकांमध्येही त्यांनी स्वत:ची छाप सोडली.

प्रभावळकरांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर त्यांची इतकी अमीट छाप आहे की, त्या दुसरं कुणी ती मिटवायचा प्रयत्नही करू धजणार नाही. नारबाची वाडी मधील कोकणी म्हातारा, पछाडलेला मधील इनामदार, एक डाव भुताचा मधी गरीब मास्तर, पोश्टर बॉईजमधील जगन देशमुख या सगळ्या व्यक्तिरेखा अगदी बावनकशी सोन्यासारख्या वाटतात.

लगे रहो मुन्नाभाई मधील त्यांच्या गांधीजींच्या व्यक्तिरेखेने त्यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराचा मानही मिळवून दिला. पण प्रेक्षकांना त्यांनी साकारलेले बापू भावले हा पुरस्कार दिलीपभाईंना मोलाचा वाटतो. खरं पाहता दिलीप प्रभावळकरांच्या भूमिकांचा आलेख हा एका लेखात पूर्ण होणारा नव्हेच. त्यासाठी पानंच्या पानं लिहावी लागतील.

अशा हरहुन्नरी अभिनेत्यास पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Recommended

PeepingMoon Exclusive