By  
on  

अभिनेता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला अपघात

मराठी सिनेसृष्टीतले अरारारा.खतरनाक फेम प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांच्या गाडीला पुण्यातील सासवडजवळ अपघात झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने ते या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे समजतेय तसंच या अपघातावेळी त्यांच्या सोबत  गाडीत अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणेसुध्दा होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली आणि हा अपघात घडला. सासवड पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन घटनेची शहानिशा केली. 

महत्वाचं म्हणजे कालच सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुण्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज प्रवीण तरडेंच्या गाडीला अपघात झाला. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive