By  
on  

अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने बिकीनी शूट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

एका मराठी अभिनेत्याला अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी पुण्यात अटक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मंदार कुलकर्णी असं या मराठी अभिनेत्याचं नाव असून त्याने  ' शेजारी शेजारी पक्के शेजारी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकरली होती. पुण्यातील प्रभात रोड येथे ही घटना घडली आहे. जबरदस्तीने बिकीनी घालण्यास सांगून अर्धनग्नावस्थेत फोटो काढल्याचा आरोप पीडित मुलीने या अभिनेत्यावर  केला आहे. २३ ऑगस्ट रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मंदार पुण्यात अभिनय वर्कशॉप घेत असे. एका नाटकाच्या ऑ़डीशन निमित्ताने त्याने त्या होतकरु अभिनेत्रीला फोटोशूट करण्यास सांगितले आणि प्रभात रोडवरी एका अपार्टमेंटमध्ये बोलावले. तिथे तिला अनेक ड्रेसवर शूट करण्यासा सांगितले असताना अचानक तिला बळजबरीने बिकीनी घालायला लावून शूट करुन घेतले.  

मंदार कुलकर्णीने  ‘पक्के शेजारी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासोबतच 'आम्ही दोघे राजा राणी' या मालिकेतही काम केलं आहे. तसंच  ‘लग्नबंबाळ’ या व्यावसायिक नाटकातदेखील काम केलं आहे. त्याने पुण्यात अनेक नाट्यशिबीरंसुध्दा घेतली आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive