आज शिक्षक दिनानिमित्त सर्वत्र गुरुंना वंदन करण्याचा आणि त्यांचे आशिर्वाद घेण्याचं खुप महत्त्व असतं. आपण आपल्याला घडवणा-या गुरुंना आयुष्यभर स्मरतो. त्यांच्या शिकवणुकमुळेच आपल्या जीवनाला दिशा मिळते. परंतु ज्यांच्यामुळे आपण ह्या जगात पहिलं पाऊल टाकतो ते आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात. अभिनेत्री रिंकू राजगुरुनेसुध्दा आज शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आपल्या आई-वडिलांना दिल्या आहेत. तिच्या या पोस्टमधून आई-वडिलांबद्दलचा आदर करा, अशीच शिकवण ती चाहत्यांना देतेय.
रिंकू राजगुरुने मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं विशेष स्थान निर्माण केलं आहे. 'सैराट' या पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या अभिनेत्रीने स्वत:मधील अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. रिंकूने ब-याचा कालावधीनंतर ‘कागर’ या सिनेमातून पुन्हा एकदा दमदार पदार्पण केलं. एका साध्या मुलीचा राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास कागरमध्ये होता. या सिनेमात रिंकूचा अभिनय अधिक प्रगल्भ झाल्यासारखा वाटला. हळवी प्रेमिका ते धुर्त राजकारणी तिने उत्तम प्रकारे उभी केली. रिंकू आता ‘मेक अप या सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. तसंच लक्षवेधी म्हणजे मनी रेसमध्येसुध्दा रिंकू सिनेसृष्टीत सर्वांवर भारी पडतेय. मानधनासाठी ती सर्वांमध्ये अग्रगण्य आहे.