Photos : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हा मराठमोळा साज तुम्ही पाहिलात का?

By  
on  

साजि-या-गोजि-या चेह-याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. पण आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली आहे. तिचे नवीन मराठमोळ्या अंदाजातले फोटो तिने नुकतेच आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. त्यात ती फारच मनमोहक दिसतेय. निळ्या गर्द रंगाची साडी आणि लाल ब्लाऊज व नथ, वेणी, हिरवा चुडा असा अस्सल मराठमोळा साज चढवलेल्या भाग्यश्रीचं सौंदर्य यात खुलून दिसतंय. 

 

'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियकर' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले असून, लवकरच तिचा 'विठ्ठल' हा सिनेमादेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. यात तिची एक विशेष भूमिका आहे.

 

 

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे.  तिच्या पाटील या चित्रपटाचे शो पश्चिम महाराष्ट्रात हाऊसफुल होत आहे. तसेच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले आहे. इतकेच नव्हे तर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही ती झळकणार आहे. भाग्यश्री लवकरच तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे.

 

Recommended

Loading...
Share