अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार 'ह्या' बॉलिवूड सिनेमात

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकर हे नाव आघाडीवर घेतलं जातं. मराठी सिनेमे, रिएलिटी शो असो किंवा मालिका इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येसुध्दा अमृताने आपले पाय यशस्वीपणे रोवले आहेत. अमृता आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. राझी, सत्यमेव जयते ह्या बॉलिवूडपटांमधून महतत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेली आपली मराठमोळी अमृता आता पुन्हा एकदा एका हिंदी सिनेमामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

खुद्द अमृतानेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'मलंग' सिनेमात अमृता झळकणार आहे. अमृताने काही दिवसांपूर्वीच ह्या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात केली असून  'एक व्हिलन', 'आशिकी 2', 'मर्डर 2' फेम दिग्दर्शक मोहित सुरु 'मलंग'चं दिग्दर्शन करतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#orangelove outfit by @nehachaudhary_

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

दरम्यान, अमृताने काही महिन्यांपूर्वीच स्वप्निल जोशीसोबत जिवलगा ह्या मालिकेसाठी छोट्या पडद्यावर स्क्रीन शेअर केली होती. तसंच हिंदीतील प्रसिध्द रिएलिटी शो 'खतरों कें खिलाडी' मध्येसुध्दा झळकणार आहे. तर सचिन कुंडलकर दिग्दर्शित पॉंडिचेरी या सिनेमातूनसुध्दा अमृता प्रेक्षकांच्या भेटीला .येणार ाहे. 

 

 

Recommended

Loading...
Share