मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या प्रेमात असल्याचं सांगतेय. सईने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एका व्यक्तिसोबतचा सईचा पाठमोरा फोटो आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे या फोटोत दिसत नाहीय. असं असलं तरी सईने या पोस्टच्या कॅप्शनमधून एका महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा केलेला आहे.
सई या पोस्टमध्ये लिहीते की, “जोड्या स्वर्गात बनतात यावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे आता प्रत्येक कारण आहे. आणि अखेर मला माझं सापडले.”यासोबतच सईने इन लव्ह हॅशटॅग वापरून ती प्रेमात असल्याचही सांगीतलं. सई लोकूर ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे विविध फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेयर करत असते. आणि नुकतच तिने तिच्या आयुष्यातील जोडीदाराविषयीची आणि ती प्रेमात असल्याची गोष्ट चाहत्यांसोबत शेयर केली आहे.
सईने याआधी काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय किस किस को प्यार करू या हिंदी सिनेमात ती कॉमेडी किंग कपिल शर्मासोबत झळकली होती. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.