लतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो

By  
on  

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आज वाढदिवसानिमित्ताने अनेकांकडून शुभेच्छा मिळत आहेत. सोशल मिडीयावर त्यांचे असंख्या चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही भारतरत्न लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

अभिनेता अंकुश चौधरीनेदेखील त्याच्या आवडत्या गायिकेला शुभेच्छा देणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अंकुशने लतादीदींसोबतचा जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो 1993 सालचा आहे. ऑल द बेस्ट या प्रसिद्ध नाटकादरम्याची ही लतादीदींसोबतची आठवण अंकुशने शेयर केली आहे. 

 

अंकुश या पोस्टमध्ये लिहीतो की, "वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा लता मंगेशकर (ऑल दी बेस्ट 1993)" या फोटोत अंकुश चौधरीसह लता मंगेशकर, भरत जाधव, संजय नार्वेकर, महेश मांजरेकर हे कलाकार देखील पाहायला मिळत आहेत.

अंकुशसह अनेक मराठी कलाकारांनी लतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share