By  
on  

स्वप्निल जोशीने बाबांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला हा फोटो

अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट आहे त्याच्या बाबांसाठी. स्वप्निलने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट केली आहे. बाबांसोबतचा लहानपणीचा फोटो स्वप्निलने शेयर केला आहे. या फोटोत स्वप्निल अगदी लहान दिसतोय.

या पोस्टमध्ये स्वप्निलने बाबांसाठी खास मेसेज लिहीला आहे. स्वप्निल लिहीतो की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. आज तुमच्या वाढदिवसानिमित्ताने मला तुम्हाला हे सांगायचं आहे की, मला माहिती नाही की मी यशस्वी होईल की नाही, पण मी नेहमीच तुमच्यासारखा वडिल बनण्याचा प्रयत्न करेल. माझं तुमच्यावर प्रेम आहे."

 स्वप्निलची ही पोस्ट सगळ्यांनाच आवडली आहे. त्याने या पोस्टमधून त्याचं वडिलांसाठीचं प्रेम सांगीतलं आहे. स्वप्निलला देखील मायरा आणि राघव असं एक मुलगी आणि मुलगा आहे. तेव्हा आपल्या वडिलांसारख एक चांगले वडिल बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचं स्वप्निल या पोस्टमध्ये म्हणतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive