दख्खनचा राजा जोतिबा ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम जोतिबांच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी लागणारं भारदस्त शरीरयष्टी कमावण्यासाठी विशालने बरीच मेहनत केली आहे. त्याने या भूमिकेसाठी तब्बल 12 किलो वजन वाढवलं आहे.
विशालने नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याचा या भूमिकेसाठीचा फिटनेसचा प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत केली आहे. चाहत्यांनाही त्याचा हा फिट लुक प्रचंड आवडला आहे.
विशाल हा आधी जिम ट्रेनर होता. त्याचा जिम ट्रेनर ते अभिनेता असा प्रवास आहे. त्याने काही मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.