By  
on  

'खाली पीली'मधील मंग्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती, सुयश टिळकने पोस्ट केले सेटवरील हे फोटो

खाली पीली या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. इशान खट्टर आणि अनन्या पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अभिनेता सुयश टिळकची महत्त्वाची भूमिका आहे. सुयश या सिनेमात मंग्या नावाचं पात्र साकारतोय. सुयशच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

सुयशने नुकतेच या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. वॅनिटीवर मंग्या लिहीलेल्या पाटीचा फोटोही त्याने पोस्ट केला आहे. शिवाय या सिनेमासाठीचा लुक आणि मेकअपमधील त्याचे फोटोही त्याने पोस्ट केले आहेत. 

या पोस्टमध्ये सुयश लिहीतो की, "मंग्यासाठी मिळालेल्या प्रेमासाठी आणि कौतुकासाठी धन्य वाटतय. मी कायम लक्षात ठेवीन अशी प्रक्रिया. लुकसाठी दिनेश दादा यांचे खास धन्यवात. 'मंग्या' आणि 'खाली पीली'वर प्रेम करण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद"

Author

Recommended

PeepingMoon Exclusive