By  
on  

पाहा Video : सोनाली कुलकर्णी म्हणते "चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार.."

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या काळात नवनवीन गोष्टी करताना दिसली. त्यातच सोनाली अनेक व्हिडीओ साँगमध्येही झळकली. 'तूच तुझी सोबती' या नव्या गाण्यातही सोनाली झळकणार आहे. सोनालीने सोशल मिडीयावर या गाण्याविषयी पोस्ट केल्या आहेत. हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सोनालीने नुकतीच या गाण्याची छोटीशी झलक शेयर केली आहे. या गाण्यात सोनाली प्रवास करत भटकंती करताना दिसतेय. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार, चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार.."

 

या गाण्यातून काहीतरी सकारात्मक पाहायला मिळणार असल्याचं दिसतय. तेव्हा सोनालीच्या चाहत्यांना तिच्या या नव्या गाण्याची उत्सुकता लागली आहे. हा एक काव्यात्मक व्हिडीओ असणार आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी सोनाली 'पाऊस तुझा नि माझा' या पावसाच्या गाण्यातही दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive