अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या अनेक व्हिडीओ अल्बमध्ये दिसत आहे. मात्र नुकताच सोनालीने स्वत:चाच अल्बम प्रदर्शित केला आहे. या नव्या काव्यात्मक अल्बमला सोनालीने स्वत: आवाज दिला आहे.'तूच तुझी सोबती' असं या अल्बमचं नाव आहे. सोनालीचा हा नवा अल्बम नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. "डोकावतो संधिप्रकाश ह्या उंच पहाडातूनी, ह्या एकट्या प्रवासात तूच तुझी सोबती, ह्या एकट्या प्रवासात, तूच तुझी सोबती, तूच तुझी सोबती " असे या कवितेचे बोल आहेत.
गौरी सरनाईक यांचे हे गीत असून सागर पाटील यांनी कम्पोझ केलं आहे. या अल्बममध्ये सोनाली एका प्रवासात असल्याचं पाहायला मिळतय. या प्रवासात अडथळे येत असतानाही ती पुढे जाताना दिसते. एका क्षणी तिच्या डोळ्यातही पाणी येत की तूच तुझी सोबती या जाणीवेने.
याआधीही सोनाली काही गाण्यांमध्ये दिसली होती. मात्र या गाण्याच्या निमित्ताने सोनाली तिच्या आवाजात चाहत्यांसाठी तिचं पहिलं वहिलं अल्बम घेऊन आली आहे. या गाण्यातून सोनाली एका वेगळ्या प्रवासात घेऊन जाते.