अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मराठी सिनेसृष्टीत नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून सोनालीने सिनेविश्वात पाऊल ठेवले होते. या सिनेमालाही 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनाली केदार यांच्या आगामी मालिकेच्या सेटवर पोहोचली. सुखी माणसाचा सदरा ही केदार यांची आगामी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. याच सेटवर सिनेमाच्या 13 वर्षे पूर्ण झाल्याचं सेलिब्रेश केदार आणि सोनाली यांनी केक कापून केलं.
खूऽऽऽऽऽप छान वाटलं #sukhimanasanna भेटून #shriswamisamartha
आणि चला आता लवकरच #bakulanamdevghotale
चा sequel करू
हो की नाही @SIDDHARTH23OCT @BharatJadhav898 ;) https://t.co/Zwavl4cvgW— Sonalee (@meSonalee) October 12, 2020
केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. मात्र या पोस्टवर सोनालीने कमेंट केली की, "खूप छान वाटलं सुखी माणसांना भेटून आणि चला आता लवकर बकुळा नामदेव घोटाळेचा सिक्वल करू." तर याच सिनेमात सोनालीसोबत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवनेही ट्विटरवर असच काहीसं लिहीलं. सिद्धार्थ त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "बकुळे येवढा केक आनून कापला... पन नक्की सेलिब्रेशन हाय कशाचं?? - नाम्या, लवकरच ब.ना.घो.2."
बकुळे येवढा केक आनून कापला... पन नक्की celebration हाय कशाचं?? - नाम्या ऽऽऽऽऽऽऽऽ..@meSonalee @mekedarshinde @sahibharat ...
लवकरच ब.ना.घो.2 https://t.co/ikOz4BF65X— SIDDHARTH JADHAV (@SIDDHARTH23OCT) October 13, 2020
सिद्धार्थच्या या पोस्टने त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या असणार एवढं नक्की. "लवकरच बकुळा नामदेव घोटाळे 2" अशी पोस्ट पाहून आता लवकरच या सिनेमाचा सिक्वल येणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. या पोस्टमधून सोनाली आणि सिद्धार्थने या सिनेमाच्या सिक्वलची इच्छा व्यक्त केली आहे.