पाहा Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीने करून पाहिली ही योगासनं

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक जण घरातच आपल्या स्वास्थ्याची योग्य पद्धतिने काळजी घेण्याचे प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील योगाच्या माध्यमातून तिच्या आरोग्याची काळजी घेते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्राजक्ता तिच्या आहारातील किंवा योगाविषयीच्या काही गोष्टी शेयर करत असते.

नुकतच प्राजक्ताने काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या व्हिडीओत ती विविध आसनं करताना दिसत आहे. प्राजक्ताने त्रयंमुखशिर्षासन आणि पिंचमयुरासन ही दोन्ही आसुनंं केली आहेत. त्याचे फायदेही या पोस्टमध्ये तिने लिहीले आहेत. सध्या प्राजक्ता घरातूनच ऑनलाईन योगा क्लासेसच्या माध्यमातून योग करते.

 

प्राजक्ताच्या या सकारात्मक आणि आरोग्यविषयक पोस्ट तिच्या चाहत्यांनाही आवडत आहेत. योग हे आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे तिच्या या पोस्ट इतरांनाही आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतील यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share