मराठी रॅपर, दिग्दर्शक श्रेयश जाधव अडकला लग्नाच्या बेडीत, पाहा फोटो

By  
on  

‘वीर मराठे’ आणि ‘पुणे रॅप’ने मराठी संगीतक्षेत्रातही रॅप संगीत प्रकार दृढ करणारा रॅपर श्रेयश जाधव भाग्यश्री सोमवंशीसोबत नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अत्यंत राजेशाही थाटातील हा विवाहसोहळा अलीकडेच पार पडला. श्रेयश अर्थात किंग जेडी या नावाने श्रेयश रॅप करतो. या सोहळ्याचे फोटो श्रेयशने नुकतेच कतेच्सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते. श्रेयश आणि भाग्यश्री विवाहवेषात खुप सुंदर दिसत होते.

श्रेयश एक रॅपर आहेच. याशिवाय त्याने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या जोडीच्या सुंदर फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Recommended

Share