By  
on  

मराठी बिग बॉस फेम सई लोकूरचं #Bridetobe सेलिब्रेशन, असा लुटला बॅचलरेट पार्टीचा आनंद

अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. फियान्से तिर्थदीप रॉयसोबत सई लोकूरचा विवाह होणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सईने तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील पार्टनर विषयी गुड न्यूज दिली होती. त्यानंतर अचानक साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून ती एन्गेज झाली असल्याचही सांगीतलं. मात्र आता लवकरचं दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या सई तिची बॅचलरेट पार्टी एन्जॉय करतेय.

सईला नुकतच तिच्या खास मैत्रिणींनी सरप्राईज दिलं आहे. बॅचलरेट सेलिब्रेशनसाठी या मुलींनी खास स्पिन्स्टर्स पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी खास डेकोरेशनही करण्यात आलं. ब्राईड टू बीचं सेलिब्रेशन करण्यासाठी मग सईने खास पेहरावही केला. पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये सई यावेळी दिसली. तिच्या या खास मैत्रिणींसोबत धमाल करत सईने छान फोटोशूटही केले.

आता उत्सुकता आहे सई आणि तिर्थदीपच्या लग्नसोहळ्याची. दोघांचा लग्नसोहळा हा काही जवळच्या लोकांसोबत बेळगाव येथे पार पडणार आहे.

तेव्हा सोशल मिडीयावर चाहत्यांना देखील या लग्नसोहळ्याची झलक पाहण्याची उत्सुकता असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive