By  
on  

“डार्लिंग तू माझी डार्लिंग तू...’’ गाण्यावर असे थिरकले प्रथमेश, रितिका आणि निखिल

'डार्लिंग' या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.  ‘टकाटक’ या सुपरहिट मराठी सिनेमात दमदार भूमिका साकारलेली रितिका श्रोत्रीच्या 'डार्लिंग’ या आगामी सिनेमातही झळकणार आहे.  या सिनेमात पुन्हा एकदा तिच्या जोडीला प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून या दोघांसोबत ‘लागीरं झालं जी’फेम निखिल चव्हाण प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हे त्रिकूट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाचं टायटल साँग नुकतच प्रदर्शित करण्यात आलय.

‘डार्लिंग’ सिनेमाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या सिनेमातील “डार्लिंग तू माझी डार्लिंग तू...’’ हे शीर्षक गीत संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. गायक रविंद्र खोमणे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेलं हे रोमँटिक गाणं गीतकार समीर सामंत आणि महेश ओगळे यांनी लिहिलं असून चिनार-महेश या आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे.   तरूणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करणारं हे गाणं असल्याचं मत चिनार-महेश यांनी व्यक्त केलं आहे.

‘डार्लिंग’ या सिनेमाद्वारे जरी रितिका श्रोत्री आणि प्रथमेश परब ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असली तरी निखिल चव्हाणनं साकारलेली व्यक्तिरेखाही महत्त्वाची भूमिका बजावणारी असल्याचं समीर आशा पाटील यांचं म्हणणं आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात रितिका, प्रथमेश आणि निखिलचा धमाकेदार डान्स पाहायला मिळतोय. 7 जानेवारी 2021 ला ‘डार्लिंग’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive