अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या 'हिरकणी' या सिनेमाला प्रेक्षकांंचं भरपुर प्रेम मिळालं. या सिनेमातील सोनालीचा अभिनय, सिनेमाचं दिग्दर्शन यासह इतर बऱ्याच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. याच सिनेमाची एक खास आठवण या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या पत्नि मंजिरी ओक यांनी शेयर केली आहे.
वसुबारसच्या निमित्ताने मंजिरी यांनी 'हिरकणी'च्या प्रवासातील एक गोड आठवण सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता अमित खेडेकर यांना गाईचं दूध काढण्याचे वर्कशॉप देण्यात आले होते. त्या दरम्यानचे फोटो मंजिरी यांनी पोस्ट केले आहेत.
मंजिरी या पोस्टमध्ये लिहीतात की, "हिरकणी फिल्म च्या दरम्यान सोनाली आणि अमित ह्यांचं गाईचं दूध काढण्याचं वर्कशॉप घेतलं होतं. त्यादरम्यानच्या काही आठवणी आज वसुबारस निमित्ताने तुमच्याबरोबर शेअर कराव्याश्या वाटल्या." या फोटोंमध्ये प्रसाद ओक, मंजिरी ओक, सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर हे गोंडस वासरांसोबत दिसत आहेत.