By  
on  

मृण्मयी आणि बहिण गौतमी देशपांडेने अशी साजरी केली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन केलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील तिच्या परिवारासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आहे. मग ही दिवाळी बहिण गौतमी देशपांडे शिवाय कशी साजरी होणार ? तर या दोघी बहिणींनी दिवाळीचा मस्त आनंद लुटला आहे. 

नुकतच अभिनेत्री मृण्मयीने दोघी बहिणींचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर या फोटोला चांगलीच पसंती मिळत असून हा फोटो चर्चेत आला आहे. या फोटोत दोघी बहिणी सुंदर पारंपारिक वेशभुषेत दिसत आहेत. "आमची दिवाळी" असं कॅप्शन लिहून मृण्मयीने हा फोटो शेयर केला आहे.

 

याशिवाय मृण्मयीने तिच्या सासऱ्यांसोबतचाही एक खास फोटो शेयर केला आहे. या पोस्टमध्ये मृण्मयी लिहीते की, "सासरे बुआ मला शेंडी लावताना... एरवी शेंड्या लावण्याचे काम माझ्याकडे असते."

यासोबतच पतिसोबतचा पाडव्याचा फोटोही मृण्मयीने पोस्ट केला आहे. तेव्हा मृण्मयीच्या या सगळ्या पोस्टवरून तिची यंदाची दिवाळी धमाल मस्तीत साजरी झाली असणार यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive