पाहा Photos : योगा आणि फिटनेससाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडिंतचे #NoExcuses

By  
on  

फिटनेससाठी अनेक कलाकार योगा आणि वर्कआउट करतात. मात्र चित्रीकरण सुरु असताना वेळ काढून फिटनेसकडे लक्ष देणं कठिण असतं. मात्र अनेक कलाकार त्यांच्या कामातून वेळ काढून फिटनेससाठी देतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही त्यापैकीच एक आहे.

तेजस्विनीने नुकतेच तिचे योगासनाचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्विनी शिर्षासन करत आहे. सध्या तेजस्विनी आउटडोअर शूट करत आहे. मात्र सोबतच फिटनेससाठीही ती वेळ काढते.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तेजस्विनी लिहीते की, "अजून तिथपर्यंत नाही.. पण त्या वाटेवर आहे." याशिवाय अनेक हॅशटॅग तिने या पोस्टमध्ये दिले आहेत. ज्यात नो एक्सक्युझ म्हणजे कोणतीही कारण न देता ती योगा करतेय. शिवाय सध्या आउटडोअर शूटवर असल्याचही तिने हॅशटॅमधून सांगितलय.

 

Recommended

Loading...
Share