अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दिली ही आनंदाची बातमी, नव्या कार्यक्रमात असेल ही जबाबदारी

By  
on  

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक उत्तम लेखक आणि कवि म्हणूनही ओळख आहे. नाटक, मालिका, सिनेमे याशिवाय विविध रिएलिटी शोमध्येही संकर्षणने कायमच एक वेगळी छाप सोडली आहे. नुकत्याच झालेल्या सिंगींग स्टार या सिंगींग रिएलिटी शोमधूनही संकर्षणने त्याचं गायनकौशल्य दाखवलं. 

आता संकर्षण प्रेक्षकांसाठी काहीतरी नवं घेऊन येत आहे. संकर्षणने नुकतीच सोशल मिडीयावर याविषयी आनंदाची बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे लवकरच तो एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर त्याचा हा नवा कार्यक्रम पाहायला मिळेल.

 

पण या कार्यक्रमात तो दुहेरी जबाबदारी पार पाडणार असल्याचं बोलतोय. यासाठीच त्याने त्याच्या चाहत्यांना काही प्रश्न विचारले आहेत. संकर्षण या पोस्टमध्ये लिहीत की, "आनंदाची बातमी. सोनी मराठीवर नवीन कार्यक्रम करतोय..ह्या नवीन कार्यक्रमात माझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे .. कोणता आहे हा कार्यक्रम ..? दुहेरी जबाबदारीत कोणती दोन कामं माझ्याकडे असतील ..?
ओळखा .. आणि तीनही प्रश्नांची उत्तरं कमेंट मध्ये द्या ..आणि शुभेच्छा तर द्याच.."

 तेव्हा संकर्षणची ही दुहेरी जबाबादारी नेमकी काय असेल ?  आणि हा कोणता कार्यक्रम असेल हे लवकरच समोर येईल.

Recommended

Loading...
Share