By  
on  

ब्युटी क्वीन स्मिता गोंदकरने यासाठी मानले चाहत्यांचे आभार

सोशल मिडीयावर काही मराठी सेलिब्रिटींचे लाखोंमध्ये चाहते आहेत. अभिनेत्री स्मिता गोंदकरचाही सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. स्मिता तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. स्मिताने नुकतीच चाहत्यांसाठी आणि तिच्या फॉलोवर्ससाठी खास पोस्ट केली आहे.

स्मिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच 5 लाख फॉलोवर्स पाहायला मिळत आहेत. म्हणजेत तिला इन्स्टाग्रामवर 5 लाख फॉलोवर्स फॉलो करत आहेत. आणि आता तिची 500 k म्हणजेच 5 लाख चाहत्यांची फॅमिली आहे. स्मिताचे अनेक चाहते सोशल मिडीयावर स्मिटन्स या नावानी आहेत. आणि हेच स्मिटन्स सोशल मिडीयावर तिला कायम साथ देताना दिसतात.

 

स्मिताने अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आणि बऱ्याच रिएलिटी शोमध्ये काम केलं आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्मिता दिसली होती. त्यानंतरही स्मिताचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. सोशल मिडीयावरही तिच्या विविध फोटो आणि व्हिडीओंना चांगली पसंती असते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive