By  
on  

'कॉमेडी बिमेडी'च्या निमित्ताने पहिल्यांदाच सूत्रसंचालन करतेय ही अभिनेत्री

सध्या मराठी टेलिव्हीजनवर विविध मालिका आणि रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातच एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. 'कॉमेडी बिमेडी' हा नवा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. मनोरंजन विश्वातील विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेले कलाकार या कार्यक्रमाच्या मंचावर परफॉर्म करताना दिसतात. यातच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचीही तितकीच चर्चा रंगली आहे.

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. सूत्रसंचालनाची स्मिताची ही पहिलीच वेळ आहे. नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून स्मिताने या कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो शेयर केले आहेत. आणि चाहत्यांनाही या अनुभवाविषयी ती सांगतेय. 

 

स्मिता या पोस्टमध्ये लिहीते की, "हा खूप आश्चर्यकारक अनुभव आहे आणि मी पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. तुमच्या सहकार्याची आणि आशिर्वादाची गरज आहे." मराठी बिग बॉस कार्यक्रमात स्मिताने चाहत्यांची मनं जिंकली होती. आणि आता या पहिल्या प्रयत्नात ती प्रेक्षकांचं लक्ष वेधतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नुकतच या कार्यक्रमात नवी मालिका 'सांग तू आहेस का?' मधील कलाकार हजर होते. या विनोदवीरांसोबत त्यांनीही धमाल केली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive