अभिनेत्री प्राजक्ता माळी एक उत्तम नृत्यांगना आहे हे ती चाहत्यांना माहिती आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेली प्राजक्ता आता अभिनेत्री, सूत्रसंचालक अशा विविध रुपात दिसते. प्राजक्ताच्या नृत्याचा प्रवास हा लहानपणी एका प्रसिद्ध रिएलिटी शोमधून झाला होता. क्या मस्ती क्या धूम या लहान मुलांच्या कार्यक्रमात प्राजक्ता दिसली होती. या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली बेंद्रे सूत्रसंचालक होती.
प्राजक्ताने नुकतीच तिच्या लहानपणीची ही खास आठवण शेयर केली आहे. प्राजक्ताने या शो दरम्यानचा थ्रोबॅक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत लहान गोंडस प्राजक्ता पाहायला मिळतेय. याशिवाय या कार्यक्रमाची होस्ट सोनाली बेंद्रे आणि डिनो मोरिया देखील आहे.
प्राजक्ता या पोस्टमध्ये लिहीते की, "काही गोष्टी डिलीट करत असताना बघा मला काय सापडलं. माझ्या यंग वर्जनला भेटा. वय 14 असावं. जिने क्या मस्ती क्या धूम या स्टार प्लसवरील कार्यक्रमात विजेती ठरली होती.
(मी पण मराठी मुलगी आहे हे कळल्यावर, माझं नृत्य झाल्यानंतर मी दमलेय हे दिसल्यावर; सोनालीनं मला एक चॉकलेट दिलं होतं)
प्राजक्ताने हा व्हिडीओ शेयर करून ही खास आठवण शेयर केली आहे.