By  
on  

कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात असे थिरकले होते दिग्दर्शक रवी जाधव

सोशल मिडीयावर लॉकडाउनच्या काळात थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड सुरु झाला होता. त्यानंतर हा ट्रेंड अधूनमधून सोशल मिडीयावर पाहायला मिळतो. अनेक कलाकार त्यांचे थ्रोबॅक, लहानपणीचे फोटो शेयर करताना दिसतात. यात दिग्दर्शक रवी जाधवही त्यांचे विविध फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करतात. मात्र त्यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

 

रवी जाधव यांनी त्यांच्या कॉलेज दरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. जेजे इन्स्टीट्युट ऑफ आर्टमध्ये रवी जाधव यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं आहे. आणि याच कॉलेजच्या आठवणी त्यांनी या फोटोतून जागवल्या आहेत. रवी यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलातील एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत रवी जाधव डान्स करताना दिसत आहेत.

या आठवणी नक्कीच त्यांच्यासाठी खास असतील यात शंका नाही

Recommended

PeepingMoon Exclusive